Posts

Showing posts from August, 2023

ओरहानचा कालप्रवास आणि संस्कृतिसंघर्ष !!! (My Name is Red)

Image
  तुर्कस्थान हा तसा एका मोक्याच्या जागचा देश. त्याच्या आधीच्या राजधानी इस्तंबूलचा एक भाग युरोपमध्ये तर दुसरा आशियामध्ये एवढं सांगितलं तरी बस आहे. त्यामुळे तिथे इस्लामी/आशियायी आणि युरोप या दोन्ही संस्कृतीचं अस्तित्व जाणवत. तुर्कस्थान मुस्लिम बहुल देश आहे त्यामुळे त्याची मुस्लिम/आशियायी प्रकृती त्यातील धर्म समाजकारण राजकारण कला यांनी स्थापित केलेली जगण्यातली आणि कलात्मक मूल्ये आणि जवळीकीमुळे युरोपातून येऊन आदळणार्या वैचारिक, कलात्मक, आणि सांस्कृतिक लाटा याच्या घुसळणीत हा देश विशेषतः इस्तंबूल सतत गोंधळलेल्या अवस्थेत असते .  पूर्व आणि पश्चिमेच्या मध्यावर असलेला तुर्कस्थान एकाचवेळी तिकडची मूल्ये स्वीकारावेत आणि नाकारावीत वाटणारा. बरं हा तणाव निव्वळ धार्मिक अस्मितांचा नाही तर कलात्मक मूल्याचा देखील आहे. या झगड्याचं , त्याला सामोरं जाणाऱ्या लघुचित्रकारांचं , यथार्थ चित्रण करणारी कादंबरी म्हणजे ओरहान पामुक या तुर्की लेखकाने लिहिलेली 'my name is red' हि कादंबरी. या कादंबरीचा पामुकला नोबेल प्राईझ मिळवून देण्यात मोठा वाट आहे एवढं सांगितलं तरी पुरे. ह्या कादंबरीचा फॉर्म आहे तो मर्डर मिस्ट